संस्थेची ठळक वैशिष्ठे

  • म.औ.वि. महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आर्थिक शक्तीतुन गरजु कर्मचाऱ्यांची आर्थिक निकड भागविणे, बचतीचे व काटकचरीस प्रोत्साहन देणे, विविध आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी उपक्रम राबविणे इत्यादीकरीता एमआयडीसी कर्मचारी पत सहकारी संस्था मर्या., नागपूर याची स्थापना सहकार कायद्याप्रमाणे सन 1997 साली करण्यात आली.

  • सर्व सहकारी बंधुच्या मदतीने रुजविण्यात आलेले संस्थेचे रोपटे वाढीस लागले असून सभासदांच्या स्वप्नपुर्तीत जसे हक्काचे घर असणे, पाल्यांना शिक्षण देणे, जमीन घेणे, लग्न समारंभ, वैद्यकीय मदतीची गरज भागविणे इत्यादीकरीता संस्था आपले महत्वपुर्ण योगदान देत आहे.

  • सर्वांच्या आर्थिक शक्तीने व मदतीने संस्था सामाजिक कार्य जसे नैसर्गिक आपत्तीत योगदान करणे, रक्तदान शिबीर, गुणवंत पाल्यांचा व सेवानिवृत्यांचा सन्मान, मृत्यु झाल्यास अनुदान असे विविध उपक्रम राबवुन सभासदांच्या दैनंदिन व्यवहारात महत्वाचे स्थान धारण केले आहे.

  • आजमितीस संस्थेचे सभासद असुन भागभांडवल सुमारे रु. २.५० कोटीच्या वर व सुमारे रु. ७ कोटीची उलाढाल संस्थेची आहे.

  • संस्थेचे कार्यकारी मंडळ विश्वस्त असुन सर्व सभासद व हितचिंतक संस्थेचे मार्गदर्शक म्हणुन कार्य करीत असुन आम्ही सर्व जण एमआयडीसी द्वारे एका नाळेत बांधलो असुन उत्तरोतर प्रगतीचा टप्पा गाठण्यास व संस्थेचा हेतु सफल करण्यास कटीबध्द आहोत. याकरीता सर्वांचे प्रेम व मदत गरजेची आहे.
२१ वा वार्षिक अहवाल सन २०१७ - २०१८

सन्माननीय सभासद बंधु आणि भगिनीनो , आपल्या संस्थेच्या पंधराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्याने सर्व प्रथम आम्ही व्यवस्थापक समितीच्या वतीने आपले सर्वाचे मन :पूर्वक हार्दिक स्वागत करतो